Wednesday, May 4, 2011

मी गर्दीत वाट हुडकतोय................



रोज सकाळ होते
, मी जागा होतो, पूर्वीही सकाळ व्हायची मी जागा व्हायचो.
उठून शाळेत जायचो, गर्दीत सामील व्हायचो, बे एके बे पासून १० वि पर्यंत मी गर्दीत चालत राहिलो,
लोक वक्तृतव स्पर्धेत भाग घेतात म्हणून मी ही घेत राहिलो,आणि अमुक एक क्लास चांगला आहे म्हणून मी पण जात राहिलो.
शाळा झाली, सगळे ११ वी / १२ वी करतात म्हणून मी ही केली,सगळे जण ढीग भरून फॉर्म भरतात म्हणून मी ही भरत राहिलो.
शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो. ........................
१२ वी नंतर सगळे कंप्यूटर क्षेत्रात जातात म्हणून मी पण गेलो.
अमुक यांचा तो आणि तमुक यांची ती सध्या एमनसी कंपनीमधे असते , इतके हजार पगार मिळतो हे ऐकत राहिलो, मी पण त्यांच्यातलाच व्हायच्या तयारीला लागलो.
अरे तो यूएस ला गेला, हा यूके हून आला , तो युरोप मधे सेट्ल झला हे ऐकत मी पण इंजिनियर होत गेलो. सगळे कॅम्पस मधे जातात तसा मी पण गेलो आणि पुन्हा एकदा त्याच गर्दीत एक दिवस सॉफ्टवेर इंडस्ट्री मधे उभा राहिलो.
शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो............................
लहान पणापासून गर्दीचा संस्कार झालेला मी असाच आयुष्यात वाहत गेलो.
माझेही इंडक्षन झाले , काम झाले, कष्ट झाले , अप्रेज़ल झाले,मॅनेजर ला शिव्या देणे झाले, /४ स्विच झले, पॅकेज वाढले.
मी एक पक्का सॉफ्टवेर इंजिनियर झालो. मी पुर्वी पंकज द्वारकानाथ मोहोटकर मधला "पन्या / पंक्या" होतो आता "पी.एम." झालो आहे. आता सगळ्या गोष्टी पैश्यात मोजू लागलो आहे.
एक दिवस लक्ष्यात आले की मी गर्दीत आहे खरा, पण मला कोणी जवळचा नाही, वीकेंडला रस्त्यात कुठे भेटेल तिथे उभे राहून माझ्याबरोबर ३/४ तास गप्पा मारणारा मित्र नाही.
मी पण आता अगदी मित्रच नसले तरी पण कलीग बरोबर रिकामा वेळ घालवतो, वीकेंड ला फालतू गप्पा आणि लंच/डिनरसाठी तडफडतो.
घरात पण मी नसतो कारण रोज १२ / १३ तास गर्दीत असतो, २ दिवस मिळतात म्हणून घरातले वीकेंड ला मला जाउ दे त्याला निवांतमहणून सोडून देतात. असा मी आज काल गर्दीत असलो तरी एकटाच असतो.
आज काल मी टिपिकल सॉफ्टवेरवाला झालो आहे, माझी कंपनी,माझे पॅकेज, माझे डेसिग्नेशन, माझा वेरियबल, माझा बुक केलेला फ्लॅट, त्याचे प्रोग्रेस मधील फोटो, माझी यूके वारी त्याचे तेच ते पकाव पीकासा वरचे आल्बम, माझी कार………..सगळ्याना दाखवत बसतो…. पण का काही कळत नाही कुठे तरी मनात कुरकुरतो, …....
मला ढीग भरून स्क्रॅप येतात, ऑरकूट / फेसबुक वर शेकडो फ्रेंड्स भेटतात, सगळे स्क्रॅप शेवटी केरात जातात आणि फ्रेंड्स हे फक्त फ्रेंड्स राहतात. त्यातलाच कोणी काय भावा कुठे असतोस ये की चा मारू हे बोलत नाही, आणि आज काल आई-आप्पा कुठं तुझ्याकड की गावाकड असले प्रश्न पण विचारत नाही. कोणी फोन करून लेका गावाकड ये कि एकदा, किंवा यंदा तरी जत्रेला ये कि भावा असे पण म्हणत नाही,
मला कोणीच ऑरकूट वरचा ये की मर्दा घराकड एकदा जेवाय असे पण म्हणत नाही,आम्ही ढीग आउटिंग /पार्ट्या करतो पण त्याची मजा यात नाही. गावाकडे आहेत काही मित्र, पण मी तिकडे जात नाही, आज कुठे तरी हुरहूर वाटते आहे की मी माझे पक्के दोस्त गमावल्याचे, ते गावाकडचे असले म्हणून काय झाले त्या हाकेसारखी आर्तता इथल्या फ्रेंड्सच्या इंवीटेशन मध्ये जाणवत नाही.
लोकही माझे मेल/स्क्रॅप/ पीकासा आल्बम पाहतात आणि ते पण; “च्यायला हा ऑनसाइट जाऊन आला वाटतेअसे म्हणत फोटो न बघता लॉग ऑफ मारतात , त्याना फार आवड नसते बघायची,एखादा कॉमेंट टाकून बस गर्दीचा नियम पाळत असतात.
गर्दीत राहून पण मी आज एकटा आहे………नावाला फक्त लोक गर्दीत उभे आहेत, आयुष्यात एक वेळी अशी येते की ही गर्दी कामात येत नाही, कलीग म्हणणारे तुमचे जवळचे तुमच्या सुखात नक्की एन्जॉय करायला येतील, पण दुखा:च्या वेळची ग्यारेंटी नाही. पण तुम्ही सुधा दु:खी व्हाल, त्या वेळेला कलीग,डिलीवरेबल्स, मीटिंग्समधे व्यस्त असतील आणि वीकेंड ऑलरेडी प्लान झाला रे.... सॉरी... असे म्हणत कलटी टाकतील. सॉफ्टवेर वाला झाला म्हणून काय?? दु:ख कधी तरी येतेच त्याला तुम्ही इंस्टालमेंट अमाउंट देऊन टाळू शकत नाही. प्रत्येक अडचण पैश्याने सोडवता येत नहीं.
अश्या वेळी लागतात ते फक्त मित्रच, जे बिचारे कधी कलीग नसतात अणि ते कुठल्याच गोष्टी पैश्यात मोजत नसतात.
मी विचार करतो की मी या गर्दीत का चालत राहिलो??सगळे करतात तेच बरोबर असेल , जे काय व्हायचे ते सगळयांचे होईल,या गर्दीच्या फुटकळ तत्वावर विश्वास ठेवत राहिलो.
काय असते ही गर्दी? इयत्ता १ ली ते …..इंटरव्यू राउंड पर्यंत काय करते ही गर्दी?? कोण ठरवतो यांची दिशा? या गर्दीत कोणच कुणाला ओळखत नाही......पुढचा चालतो म्हणून मागचे चालतात..आणि मागे खूप लोक आहेत म्हणून पुढचा चालत राहतो.
आपण जगत नाही आहोत आपण आपल्याला जगवत आहोत,कशासाठी ते कुणालाच माहीत नाही, मी माझे वैयक्तिक आयुष्य विसरत चाललो आहे का? मला पक्के मित्र मिळत नाहीत का?का मीच त्या वाटेला जात नाही. विचार करून डोके दुखु लागले ,उपाय म्हणून कायतर मशीन ची हॉट कॉफी मारुन पार्किंग मधे कलीगला घेऊन चक्कर मारुन आलो.
पण आता ठरवले आहे……काही तरी केले पाहिजे, जुन्या आयुष्यात परत गेले पाहिजे, का मी जाउ शकत नाही? माझे डेसिग्नेशन मला आडवे येते का?? कोण मला अडवणार? का नाही मी सुखी एवढे पैसे मिळवून, का नाही मला कोण अगदी जवळचा इतके सगळे कलीग असून?
बरेच काही हरवलय........बरेच काही गमावलय.............नक्की कुठे वाट चुकली हे पण कळत नाहीए........गर्दी कुठे तरी जाते म्हणून मी माझे स्वत:चे असे सगळे सोडून गर्दीतला दर्दि झालो..........गर्दी करते ते सगळे नियम पाळायला लागलोय.
कधी तरी या कळपातून वेगळा रस्ता काढून बाहेर जायचे आहे.
बसस्स.......आता ...ठरवले आहेआणि सुरुवातही केलेली आहे,कलीग म्हणतात हा आज काल वीकेंड ला येत नाही बरोबर, हा थोडा वेगळाच वाटतो आहे, लास्ट वीक म्हणे तेच्या गावी गेला होता तिथे सुट्टी टाकून त्या लोकांबरोबर राहिला. आज काल म्हणे पुन्हा आळंदीला ज्ञानेश्वरांच्या मंदिरात जातो, ए हा असा का करतो? या वेळी वारीला सासवडपर्यंत पायी गेला होता म्हणे,अजुन काय तर या वेळी म्हणे पुन्हा "घुमाई देवी" च्या यात्रेला गावी जाणार आहे, हे हा खरेच असे करणार आहे?
मी थोडा वेगळा झालो आहे, गर्दीत आत्ता थोडी कुर्बुर आहे , अगदी मान खाली घालूनच चालत आहे..........लोक वाट चुकलेला का म्हणेना मला……पण मी मान खाली घालून माझी वाट शोधत आहे.
एकदा विचार करा मित्रांनो या सगळ्या गडबडीत आउटकम काय?? समाजात फक्त आपण आपल्या नावावर काहीस्क्वेअरफूटघेण्यासाठी धडपडत आहोत काय?? का उगाच फ्रेंड्स ग्रुप वरचे फ्रेंड्स काउंट दाखवून स्वत:चे समाधान करत आहोत?

Sunday, January 10, 2010

प्रेम म्हणजे??



प्रेम.. तसं म्हणलं तर कित्ती सोप्पं.. पण सांगायचे म्हणले तर भल्या-भल्यांचे तोंड बंद होतील. वारा कोणी पाहीलाय? देव कुणाला दिसलाय? पण म्हणुन काय कोणी त्याचे अस्तित्व नाकारते का? प्रेमाचे अगदी तस्संच आहे. प्रेमाचा अविष्कार तुम्हाला कधी, कुणाच्या रुपात, कुणाकडुन होईल हे कोणीच सांगु शकत नाही.

बऱ्याच लोकांच्या मते, प्रेम ही एक मानसीक आणी शारीरीक भावना आहे. जेव्हा तुमचातो”, किंवातीतुमच्या आयुष्यात येते, तेव्हा तुम्हाला आपोआपच प्रेमाची जाणीव होते. अंगावर रोमांच येणे, पोटात गोळा येणे, तासं-तास शुन्यात नजर लावुन बसणे अश्याप्रकारची अनेक लक्षणे तुम्हाला प्रेमाने झपाटलेल्यांमध्ये दिसुन येतात. पण हे खरंच प्रेम असते का? मी बराच विचार केल्यावर असं लक्षात यायला लागले की “I Love You”, किंवामाझे तुझ्यावर प्रेम आहेकिंवा आणखी काही.. आजकाल आपण जरा जास्तीच मुक्तपणे वापरतो. आजकाल कशाला.. मला आठवतेय मी आठवीत असतानाच माझ्या एका मैत्रीणीला “I love You” म्हणालो होतो. आज त्याची आठवण झाली कि मात्र हासु आल्याशीवाय रहात नाही. आता वाटते ते केवळ एक आकर्षण होते, मैत्रीपेक्षा थोडे जास्ती आणी प्रेमापेक्षा थोडे कमी. हेही एक कारण असु शकेल ज्यामुळे पाश्चात्य देशांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण खुss जास्ती आहे. कुठल्याही क्षुल्लक कारणामुळे लोक एकमेकांच्या प्रेमात पडतात, लग्न करतात, .. मग असं अचानक आलेले प्रेम, अचानक निघुन जाते आणि लग्न मोडतात.

मग प्रेम नक्की आहे तरी काय?
Love could be an attachment resulting from an appreciation of another’s goodness in their heart.

आपण कसे दिसतो?, आपल्याकडे किती पैसा आहे? यावर प्रेमाचे निकष नक्कीच ठरत नाहीत. प्रेम हे शुध्द आहे, निखळ आहे. प्रेम फक्त एकमेकांच्या चांगुलपणावर केंद्रीत झालेली एक भावनीक ओढ आहे. तुम्हाला प्रेम अनुभवायचे असेल, तर आधी प्रेम करायला शिका, दुसऱ्याला द्यायला शिका. Giving IS LOVE.

आपल्या आयुष्यात डोकावल्यावरच प्रेमाचे कित्ती तरी नातेसंबंध दिसतील. आपण आपल्या मुलांवर प्रेम करतो. त्यांना गोंजारतो, त्यांची काळजी घेतो, काय हवे / नको ते बघतो, त्यांची सर्वतोपरी काळजी घेतो, म्हणजेच थोडक्यात आपण आपले प्रेम व्यक्त करतो. आपण आपल्या कामावर प्रेम करतो आणी त्यासाठी आपण आपले सर्वस्व अर्पण करतो, जेणे करुन आपले boss, आपले co-workers impress होतील. आपण आपल्या पाळीव प्राण्यांवर प्रेम करतो, कारण त्यांच्याकडुन आपल्याला एक प्रकारचे affection मिळत असते. आपला जिवनसाथी, आई-वडील, भाऊ-बहीण प्रत्येकाला काहीतरी आपण देतच असतो, आणी त्या देण्यात जो आनंद मिळतो, तो नक्कीच इतर कश्शातच मिळत नाही. But the effect is genuine, allowing you into another persons world…which is where we want to be when we are “in love” and in a relationship.

एकदा कुठेतरी वाचनात आले होते .. “Your parents will always love you more then you will love them and you in turn will love your children more then they will love you. the reason being that deep love emanates from knowledge”

लेखक म्हणतो.. “डोळे बंद करा आणी कोणत्याही १० गोष्टींचा विचार करा. तुम्हाला डोळ्यासमोर ज्या ज्या १० वस्तु, व्यक्ती दिसतील त्यावर तुम्ही मनापासुन प्रेम करता.”

प्रेम कुणी, कुणावर करावे याला काहीच बंधने नाहीत. संस्कृतीने, कायद्याने बंधने असली तरी मनाचे काय हो? त्याला तर कुठलेच बंधन नाही. प्रेमाचे रंग वेगळे, आकार वेगळे, त्याची व्याप्ती खुप मोठ्ठी आहे. त्याची व्याख्या करणं ही खुप कठीण कामं आहे. पण त्याचा अनुभव मात्र अंगावरुन मोर-पिस फिरवल्यासारखा कोमल, मृदुल आणी अंगावर रोमांच फुलवणारा आहे.

ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता तिच्या आठवणी आपल्या ह्रृदयात जपुन ठेवा. तुमच्या कृतीतुन तिला तुमच्या प्रेमाची जाणीव करुन द्या. तुम्हाला कदाचीत कळणारही नाही.. but the other person will feel it when you do kind things to show you care. Love is the most unselfish emotion we should posses!!.

मागे कधीतरी वाचलेली एक मराठी कविता.. थोडीफार आठवतीये .. अर्धवट :

मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं !

प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
…..

दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं, घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !… निट अशी आठवत नाही.. तरी पणत्याचा शेवट असा होता..:: प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

Note: Don’t forget to leave your comments below.